जागतिक महिला दिनानिमित्त मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून ठामपाच्या महिला सफाई कामगारांची तपासणी

शहराच्या स्वच्छतेमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची आज मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक चाचणी करण्यात आली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापालिका आयुक्त् अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही चाचणी करण्यात आली. महापालिकेच्या कोरस आरोग्य केंद्र येथे या मॅमोग्राफी चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या स्वच्छतेमध्ये महत्वाचे योगदान असते ते सफाई कर्मचाऱ्यांचे. महिला कर्मचारी देखील सफाईचे काम करत असून अनेकदा त्या आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात, अनेकदा कर्करोगाच्या चाचण्या या महागड्या असल्यामुळे अनेक महिलांना परवडणारे असते. मात्र आजार बळावल्यानंतर उपचार करणे कठीण होवून जाते. यासाठी आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाची प्राथमिक चाचणी करण्यात आली. या चाचणीचा लाभ जवळपास ५० हून अधिक महिला सफाई कामगारांनी घेतला. या चाचणीचा अहवाल त्यांना दोन दिवसात मिळणार असल्याचे माता बालसंगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी नमूद केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading