जागतिक पर्यावरणादिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीने वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेद्वारे प्रती वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनी ठाणे महानगरपालिकेच्या उद्यान, वृक्ष प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे आनंदनगर, घोडबंदर रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता 15 वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त अनुदानातून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाकरिता नक्षत्र वन संकल्पनेचा अवलंब करुन 12 राशींनुसार अनुकूल वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आली. या संकल्पनेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून त्यांना ही कल्पना अत्यंत आवडली असल्याचे नागरिकांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading