जागतिक एड्स प्रतिबंध दिनानिमित्त उकृष्ट काम करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

जागतिक एड्स प्रतिबंध दिनानिमित्त उकृष्ट काम करणाऱ्या आरोग्य केंद्र आणि स्वयंसेवी संस्थांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या हस्ते आज गौरव करण्यात आला.
नवीन एच.आय.व्ही.संसर्ग रोखणे, कलंक आणि भेदभावाच्या घटना रोखणे, एच.आय.व्ही. ने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शून्यावर आणणे. या दृष्टीकोनातून वाटचाल सुरु आहे. जिल्ह्यात एच.आय.व्ही. संसर्गितांची आकडेवारी कमी होत असल्याचे दिसत असून सन 2030 पर्यंत एड्स मुक्त भारत करण्याचे उद्द‍िष्टे आहे.यासाठी शासनाद्वारे सामाजिक संस्थांच्या मार्फत अनेक योजना राबविल्या जात असून जनजागृती करण्यात येत आहे.
ठाणे सामान्य रुग्णालयांतर्गत कार्यरत आय.सी.टी.सी.,ए.आर.टी, रक्तपेढी, डि,एस आर सी प्राथमिक आरोग्य केंद्र, महानगरपालिके मधील आर.सी. एच आणि आर एन.टी. सी.पी मधील सेंटर मिनाताई ठाकरे रुग्णालय, ए.आर.टी सेंटर छत्रपती रुग्णालय,कळवा, एस.टी.आय सेंटर,सामान्य रुग्णालय ठाणे, ब्लड लाईन ब्लड बॅक अशा अनेक संस्थांचा गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading