​परदेशातून ठाण्यात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण

परदेशातून ठाण्यात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. या चारजणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या चारही जणांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी हे चौघे परदेशातून ठाण्यात आले होते. त्यांची कोणत्याही प्रकारची कोरोना चाचणी विमानतळावर करण्यात आली नसल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. महापालिकेनं परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी तपासली असता ही माहिती पुढे आली असून या चौघांना तपासणीत कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या चौघांमध्ये तीन जणं एकाच कुटुंबातील असून ते नेदरलँडवरून तर अन्य एकजण कॅनडावरून आला आहे. या चौघांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे की नाही याची तपासणी केली जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading