जलवाहतूक प्रकल्पाला १०० टक्के अनुदान देण्याच जल परिवहन केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आष्वासन

ठाणे शहराला लाभलेला खाडी किनारा तसेच शहरात होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषण
टाळण्यासाठी पाच महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा पर्याय आवश्यक असल्याने
ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह जलवाहतूक केंद्रीय मंत्री मंनसुख
मंडाविया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विकास प्रकल्प बाबत सादरीकरण करून चर्चा
केली. ठाणे महानगरपालिकेने तयार केलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या ठाणे –
वसई -कल्याण डिपीआर ला 645 कोटीची मान्यता मिळाली असून त्याचे नियोजनाचे
काम सुरू झालेले आहे. त्यापैकी त्यापैकी पहिल्या टप्प्यातील सुरू झालेल्या वसई ते ठाणे
-कल्याण जलमार्ग क्रमांक 53 या 50 किलोमीटरच्या मार्गावर प्रस्थावामध्ये एका ठिकाणी
मल्टी मोडल हब आणि विविध ठिकाणी दहा जेटी असून त्यापैकी 4 जेटीची कामे
प्रस्तावित केलीअसून त्यासाठी जेनपेटी मार्फत कार्यवाही सुरू आहे. कामांसाठी 85 कोटी
एवढ्या रकमेचा अनुदान प्राप्त होण्यासाठी तसेच ठाणे ते मुंबई आणि नवी मुंबई हा 13
किलोमीटरचा मार्गवरही 18 जेटीची आणि अनुषंगिक कामे सुरू करायची आहेत. या
साठी 717 कोटीची आवश्यकता आहे. यासाटी मान्यता मिळावी याकरीता खासदार
राजन विचारे यांनी जल परिवहन केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांची भेट घेऊन
त्यांना या कामासाठी लागणारा निधी लवकर वितरित करून द्यावा जेणेकरून कामे
लवकर मार्गी लागतील अशी विनंती केली. त्यावर केंद्र सरकार मार्फत या प्रकल्पासाठी
१०० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मनसुख
मंडाविया यांनी दिल. तसेच पहिल्या टप्प्यातील कामाची 3 महिन्याच्या आत प्रत्यक्षात
सुरुवात करा आणि दुसऱ्या टप्प्यातील डीपीआर ३ महिन्यात सादर करा असे आदेश
महापालिका प्रशासनाला दिले. या जलवाहतुकीमुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन
नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading