जपानी विद्यार्थ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत सध्या ठाणे शहर भेटीवर असलेल्या जपानच्या क्योटो सांग्यो विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शुक्रवारी सायंकाळी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची भेट घेतली.

शहराबद्दलचा अनुभव, ग्रंथालय, जपानी कार्य संस्कृती यावर या बैठकीत चर्चा झाली. जपानमधील क्योटो सांग्यो या विद्यापीठाचे २० विद्यार्थी आणि त्यांचे २ शिक्षक २० ऑगस्ट पासून ठाणे शहर भेटीवर आहेत. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाची प्राच्य विद्या संस्था आणि क्योटो सांग्यो विद्यापीठ यांच्यात २०१२ पासून सांस्कृतिक देवाण घेवाण हा कार्यक्रम सुरू आहे. यापूर्वी, २०१७ आणि २०१९ मध्ये ठाणे शहराचे तत्कालीन महापौर आणि आयुक्त यांची त्यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली होती. योग सत्र, हिंदी आणि इंग्रजी भाषेची तोंडओळख, भारतीय संस्कृती दर्शन, ठाणे आणि मुंबई शहर भेट असा या विद्यार्थ्यांचा भरगच्च कार्यक्रम आहे. त्यात मालिकेत या विद्यार्थ्यांनी ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची भेट घेतली. विद्या प्रसारक मंडळाचा हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. दोन शहरांतील, देशांतील विचारांची, संस्कृतीची देवाण घेवाण या निमित्ताने होते आहे. आपण जपान हा बहुतांश पुस्तकातून, कार्टून मालिकांमधून पाहिलेला असला तरी त्यांच्या आणि आपल्या धारणांमध्ये बरेच साम्य आहे. या निमित्ताने जपानमधून आलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करता आली हा सुखद अनुभव होता, असे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले. विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. महेश बेडेकर यांनी विद्यार्थी भेटीचा उद्देश, त्यांचा कार्यक्रम याची माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (१) श्री. संदीप माळवी उपस्थित होते. जपानी विद्यार्थ्यांसह आलेले पथक प्रमुख प्रा. डॉ. ओहिरो आणि प्रा. डॉ. शिगा यांनी त्यांना या भेटीत आलेले अनुभव याविषयी भाष्य केले. ठाणे शहर अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित वाटल्याची भावना ओहिरो यांनी व्यक्त केली. येथील नागरिक अतिशय आदित्यशील आणि मदतीसाठी तत्पर आहेत. आमच्या सोबत असलेल्या ठाण्यातील विद्यार्थ्यांनीही आम्हाला खूप सहकार्य केले, असे ओहिरा म्हणाले. यावेळी जपानी विद्यार्थ्यांनी हिंदीत भाषेत स्वत:ची ओळख करून दिली. तसेच, डोरेमॉन, सुशी मासा यांच्याबद्दल भारतात असलेल्या कौतुकाचा आवर्जून उल्लेख केला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading