ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गोरेगावकर यांचे निधन

मराठी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात करून इंग्रजी वृत्तपत्रात आपला आगळावेगळा ठसा उमठवणारे ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र तानाजी गोरेगावकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराचे झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ५८ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. ठाणे प्रेस क्लबची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या क्लबचे पहिले अध्यक्ष भूषविले होते.
मूळ रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील रहिवासी असलेले गोरेगावकर यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पालघर जिल्ह्यात झाले होते. इलेक्ट्रीकल इंजिनिअर असलेल्या देवेंद्र गोरेगावकर यांच्या पत्रकारितेला डोंबिवलीतून सुरूवात केले. २०००-०१ च्या सुमारास ते ठाण्यात आले. सकारात्मक पद्धतीने पत्रकारिता करताना, त्यांनी सामाजिक समस्यांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली. याचदरम्यान गोरेगावकर यांनी आपला मोर्चा इंग्रजी दैनिकाकडे वळवला मात्र मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने ते जास्त काळ तेथे रमले नाहीत. मुळात वाचन आणि लेखनाची आवड असल्याने त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात मुक्तपत्रकारीता करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी घोडबंदर रोड येथील मोघार पाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांसह पत्रकारमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
………..

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading