छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्यं करणा-या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ शासकीय विश्रामगृहासमोर निषेध आंदोलन

छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात वक्तव्यं करणा-या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निषेधार्थ शासकीय विश्रामगृहासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाच्या ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातर्फे हे आंदोलन करण्यात आलं. अजित पवार माफी मागत नाहीत तोपर्यंत ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षानं दिला आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांनी पवार-आव्हाड मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे अजित पवारांच्या विरोधातील फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात दिसत होते. जसा काका तसा पुतण्या अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading