प्रसाद चिकित्सा द्वारे वडघर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

प्रसाद चिकित्सा द्वारे वडघर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधित संस्कृती वर्धनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे आणि धरणीमातेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रसाद चिकित्साद्वारे जागतिक आदिवासी दिनाचे महत्व समजावून सांगत या दिनाची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट पटवून देण्यात आले. संस्कृतीच्या विविध आयामांचे विश्लेषण करीत वेष संस्कृती, खाद्य संस्कृती, भाषा संस्कृती, व्यवसाय आणि शेती संस्कृती अशा विविध संस्कृतींचे जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता, महत्व आणि प्रक्रिया ही समजावून सांगीतली. रानभाज्यांची ओळख पुढच्यापिढीस व्हावी म्हणून रानभाज्यांचे प्रदर्शन, पारंपरिक वेषभूषा आणि नृत्य यांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांनी उत्स्फूर्तपणे तारपा नृत्य, गौरी नृत्य आदी पारंपारीक नृत्य तसेच जंगलावर आधारीत गाणी सादर करीत आनंद व्यक्त केला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी मेढे वडघर, प्रसाद चिकित्साचे कर्मचारी तसेच 190 महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी संस्कृतीचे जतन, संवर्धन होण्यासाठी पुढील पिढ्यांकडे तिचे हस्तांतरण होणे आवश्यक असते. अशा कार्यक्रमांतुन संस्कृती प्रवाही होण्यास मदत होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading