चैत्र वासंतिक नवरात्रोत्सव देवीची चैतन्यपूर्ण आगमन मिरवणूक

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या प्रारंभी देवीचे आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आले. या मिरवणुकीत देवीच्या आगमनासाठी ३०० हून अधिक पथक तसेच संपूर्ण ठाणे जिल्हयातून वारकरी सांप्रदायाचे वारकरी पथके, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझीमपथक, घोडेस्वार, मावळे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. या देवीच्या स्वागतासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनीही भक्तिपूर्वक देवीचे रथ ओढून स्वागत केले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading