चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावर क्रिकेट सराव करताना क्रिकेटपटूंना जुन्या आठवणी ताज्या

खारटन रोड येथे आकस्मित आणि अचानक पणे उद्भवलेल्या दुर्घटनेच्या घटनेमुळे का होईना जेव्हा चेंदणी कोळीवाड्यातील टायटन क्रिकेट क्लब च्या तरूण क्रिकेटपटूंना या आकस्मित चालून आलेल्या संधीचा फायदा घेत जेव्हा याच चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावरील काँक्रीट मैदानावर क्रिकेट सराव करताना पाहून सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर ताज्या झाल्या.
चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावर गावातील जुन्या पिढीतील जुने जाणते अनेक जण मनमुराद क्रिकेट खेळले आहेत हे जर गावातील आजच्या तरुण पिढी ला सांगितले तर त्यांना खरच वाटत नाही. त्यात आताच्या तरूण पिढीचा कोणताच दोष  नाही कारण जुन्या पिढीनं उपभोगलेला आंनद त्यांना लुटता आला नाही हे त्यांचे दुर्भाग्य. या आपल्या चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावर काँक्रीट मैदान होण्यापूर्वी तेथे ‘ नव महाराष्ट्र हुतुतू संघ ‘ या गावातील हुतुतू संघाचा सराव आणि सामने येथे रंगत होते. पुढे याच मैदानावर  यंग कोळीवाडा क्रिकेट क्लब मधील गावातील जूनी पिढी रोज सायंकाळी  क्रिकेट चा सराव करीत होती पुढे त्यांचा वसा ‘श्री सेवा मित्र मंडळ ‘ या मंडळातील तरूणांनी क्रिकेट सराव आणि क्रिकेटचे सामने खेळण्याचा आणि भरविण्याचा पायंडा नित्यनेमाने पडला आहे.  याच चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावरील काँक्रीट मैदानावर रविवारी दिवसभर चेंदणी कोळीवाडा गावातीलच इतर संस्था, धी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, आंनद भारती व्यायाम शाळा, महागिरी कोळीवाडा येथील क्रिकेट क्लब या वेगवेगळ्या संघांना मैदानावर आमंत्रित करून त्या त्या संघा बरोबर फ्रेंडशिप सामने रंगत त्याकाळी विविध संघातील नावाजलेले खेळाडू या मैदानात खेळून गेले आहेत काही ही असो खारटन रोड येथे आकस्मितपणे उद्भवलेल्या दुर्घटनेच्या घटनेमुळे का होईना जेव्हा चेंदणी कोळीवाड्यातील टायटन क्रिकेट क्लब च्या तरूण क्रिकेटपटूंना या आकस्मित चालून आलेल्या संधी चा फायदा घेत जेव्हा याच चेंदणी कोळीवाडा बस स्थानकावरील काँक्रीट मैदानावर क्रिकेट सराव करताना पाहून सर्व जुन्या आठवणी डोळ्यासमोर ताज्या झाल्या.  चेंदणी कोळीवाड्यातील हे मैदान पुन्हा चेंदणी कोळीवाड्यातील स्थानिकांना, रहिवाशांना आणि त्याच्या मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध नाहीत. वाढलेल्या शहरांची गरज लक्षात घेता जी मैदाने शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून गिळंकृत केली गेली ती स्थानिक भूमिपुत्रांना परत मिळाली पाहिजेत. ती परत मिळण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना आणि रहिवाशांना आपल्या पुढील पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने संघटीतपणे रस्त्यावर उतरून मोठा लढा लढावा लागेल.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading