स्पेनमध्ये अटक करण्यात आलेल्यास ६ महिन्यांनंतर तात्पुरते सोडण्याचे स्पेनच्या न्यायालयाचे आदेश

ब्रिटनचा रहिवासी असलेल्या ४१ वर्षीय नागरिकाला ज्याला स्पेनमध्ये रेड कॉर्नर नोटीसीच्या आधारे अटक करण्यात आली होती त्याला स्पेनच्या न्यायालयानं तात्पुरते सोडण्याचे आदेश दिले आहेत. ऋषीकेश कर्डिलेच्या विरोधात त्याच्या पत्नीनं कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. ठाणे न्यायालयानं पत्नीला घटस्फोट मंजूर केला आणि कर्डिलेला त्याच्या तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा ताबा आईकडे देण्याचे आदेश दिले. पण कर्डिलेनं या आदेशाचं पालन न केल्यानं त्याच्या पत्नीनं त्याच्याविरूध्द अवमान याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानं त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. मूळच्या नाशिकच्या असलेल्या कर्डिलेनं ठाण्यातील एका मुलीशी ९ वर्षापूर्वी लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचा दावा २०१४ पासून सुरू होता. लग्नाच्या वेळी भारताचा नागरिक असलेला कर्डिले नंतर ब्रिटिश नागरिक झाला. कर्डिलेला दाव्याचा निकाल लागेपर्यंत देखभाल खर्च आणि निवास खर्चापोटी दरमहा प्रत्येकी २० हजार रूपये देण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्याचंही पालन कर्डिलेनं केलं नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading