चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने नि:शुल्क सराव परीक्षा सत्राचे आयोजन

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने नि:शुल्क सराव परीक्षा सत्राचे आयोजन करण्यात आलं आहे. 28 मे रोजी UPSC ची पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली असून संस्थेच्या वतीने नि:शुल्क मार्गदर्शन करण्यात येत आहे. केंद्रीय लोकसेवा पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत संस्थेतील 2022-23 या प्रवेश वर्गातील विद्यार्थी आणि शहरातील इच्छूक विद्यार्थ्यांकरीता 3 जानेवारी पासून मे पर्यंत एकूण 36 सराव परीक्षा सत्राचे आणि सराव परीक्षेतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मूल्यांकन करण्याबाबतचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सराव परीक्षेला शहरातील इच्छूक विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी आवाहन केले आहे. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading