आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसावर प्राणघातक हल्ला होण्याची घटना

आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसावर प्राणघातक हल्ला होण्याची घटना घडली आहे. मध्य रेल्वे मार्गावर आंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस सुनिल कुमार गुप्ता हे कर्तव्यावर असताना स्थानक परिसरात तिकीट तपासणी करत असताना आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास गुप्ता यांच्या मानेवर एका प्रवाशाने प्राणघातक हल्ला केला. यामुळे गुप्ता यांच्या मानेवर मोठी जखम झाली असून त्यांना कल्याण येथील रेल्वेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी जखमी सुनिलकुमार गुप्ता यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती सदस्य अमोल कदम यांनी भेट घेतली आणि विचारपूस केली तसेच रेल्वे प्रशासनाला पुन्हा अशा घटना घडू नये याकरिता कळवले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading