चंदनवाडी भागात मिळाली मोराची दोन पिल्लं

एकीकडे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ठाण्याच्या मध्यवर्ती अशा चंदनवाडी भागात मोराची दोन पिल्लं मिळाली आहेत. काल एका पुठ्ठ्याच्या खोक्यात असलेली ही पिल्लं मिळाली होती. दोन व्यक्ती एक खोका घेऊन चालले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांनी त्यांना हटकलं आणि खोक्यात काय आहे याची विचारणा केली त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरूवात केली. तेव्हा महेश कदम यांनी त्यांना पोलीस स्टेशनला चला आणि काय ते सांगा असं सुनावलं. त्यावर या दोन व्यक्तींनी खोका रस्त्यात टाकून पलायन केलं. खोक्यामध्ये मोराची पिल्लं असल्याचं आढळल्यानं तात्काळ वन विभागाला पाचारण करून मोराची ही दोन पिल्लं वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. ही पिल्लं कशी आली, कोणी आणली याचा शोध घेतला जात असून एखाद्या प्रभावशाली व्यक्तीनेच ही पिल्लं आणली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading