घोडबंदर रोड वरील आनंद नगर कडून ठाण्याकडे जाणा-या चौकात काल रात्री अपघात

घोडबंदर रोड वरील आनंद नगर कडून ठाण्याकडे जाणा-या चौकात काल रात्री एक अपघात झाला. सुदैवानं हा अपघात रात्री झाल्यामुळं अप्रिय घटना टळली. या चौकात वाहतूक नियमनासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे. हा परिसर डी-मार्ट, नोबेल हॉस्पिटल, कासार वडवली पोलिस ठाणे आणि कॉसमॉस ज्वेल सारख्या आकाराने मोठ्या गृह संकुलाचा. या ठिकाणी बरीच गृह संकुले असल्याने बर्याच मोठ्या प्रमाणावर पादचारी रस्ता ओलांडत ये जा करीत असतात. बरोबर त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी सिग्नल आहेत पण ते नेहमीच नादुरुस्त असतात आणि जेव्हा चालू असतात तेंव्हा वाहन चालक सिग्नलच्या सुचनेला न जुमानता वाहने भरधाव वेगाने हाकत असतात. काल रात्री रस्ता ओलांडणा-या व्यक्तीला वाचावण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. नशिबानेच त्यात कोणी दगावले नाही कारण हा अपघात दिवसा न होता कमी वर्दळीच्या वेळी झाला. अन्यथा गंभीर प्रसंग ओढवला असता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading