नौपाड्यासारख्या मध्यवस्तीत एकाच रात्रीत दोन घरफोड्या

ठाण्यात घरफोडीचे सत्र सुरू असून नौपाड्यासारख्या मध्यवस्तीत एकाच रात्रीत दोन घरे फोडण्यात आली. भास्कर कॉलनी येथील लक्ष्मी नारायण सोसायटीत दुसऱ्या मजल्यावरील दोन घरे एकाच रात्रीत फोडण्यात आली. मात्र सुदैवानं कोणतीच वित्तहानी झाली नाही. मात्र कपाटे उघडून दोन्ही घरांमध्ये अस्ताव्यस्त पसारा करून चोरांनी पोबारा केला. पहिल्या आणि ३ऱ्या मजल्यावरील लोकांना याचा मागमूसही लागला नाही. पोलिसांनी देखील कागदपत्रे न करता, काही ऐवजी गेला नाही ना मग कशाला तक्रार करता असा प्रश्न विचारला. या चोरीमुळे उर्वरित लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading