घोडबंदर रस्ता वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी सध्याच्या रस्त्याच्या दोंन्ही बाजुस असलेले सेवा रस्ते मुख्यरस्त्यात एकत्रीत केले जाणार

घोडबंदर रस्ता वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी सध्याच्या रस्त्याच्या दोंन्ही बाजुस असलेले सेवा रस्ते मुख्यरस्त्यात एकत्रीत केले जाणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक रस्ता वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी भेट घेतली. त्या वेळी सरनाईक यांनी पालिका आयुक्तांना सुचना केली. पालिका आयुक्तांनी ही सुचना मान्य केली आहे. घोडबंदर रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे या भागातील रहिवाशांना प्रचंड वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत आहे. घोडबंदर रोडहून इच्छित स्थळी जाण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नसल्याने या रोडवरील वाहतुककोंडीमुळे कमीत-कमी अंतरासाठी अर्धा ते एक तासाचा कालावधी लागत आहे. रहिवाशांच्या तक्रारी वरुन आमदार प्रताप सरनाईक यांनी सर्वेक्षण केलं. त्यावेळी या भागात पार्किंगची मोठी समस्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पार्किंगमुळे वाहनचालक सर्व्हिस रोडचा वापर न करता मुख्य रस्त्याचाच वापर करीत असून सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या गटारावरील ५ ते ६ फुट असलेल्या फुटपाथचा वापर पादचार्यांना होत नसल्याचे निर्दशनास येत आहे. जर दोन्हीं बाजूच्या ९-९ मीटरचा सर्व्हिस रोड हा घोडबंदरच्या मुख्य रस्त्याला जोडल्यास आणि मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन-दोन मीटरचा फुटपाथ केला तर पादचार्यांना आणि वाहनचालकांना या फुटपाथ आणि रस्त्याचा वापर करता येईल. आणि अतिरिक्त १४ मीटर सर्व्हिस रोड घोडबंदर रोडला जोडल्यास तेथील वाहतूक कोंडी सुटेल. तसेच स्थानिक नागरिक रस्त्यावर पार्किंग करीत असल्यामुळे त्यांच्यासाठी कापूरबावडीपासून गायमुखपर्यंत ६ ते ७ पार्किंग प्लाझाची निर्मिती करावी, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना सुचविले. त्याबाबत आयुक्त अभिजित बांगर यांनी नगर अभियंत्यांना यासाठीचा खर्च विचारला असता त्यावर त्यांनी ५० ते ६० कोटी खर्च येईल असे सांगितले. हा पर्यायी मार्ग करताना तो पुर्ण सिमेंट काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करावा अशी सुचना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. ती सूचना मान्य करून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading