निकृष्ठ गव्हावरून जाब विचारला म्हणून पत्नीशी वाद घालणा-या शिधावाटप दुकानदाराला पती आणि मुलानं केली मारहाण

शिधावाटप दुकानदाराने निकृष्ठ गव्हावरून जाब विचारला म्हणून पत्नीशी वाद घालणा-या शिधावाटप दुकानदाराला पती आणि मुलानं मारहाण करण्याची घटना किसननगरमध्ये घडली. वागळे इस्टेट, शांतीनगर भागात राहणा-या प्रमोद जयस्वाल यांचं किसननगर नंबर २ मध्ये शिधावाटप दुकान आहे. त्यांच्या दुकानात त्याच परिसरात राहणा-या मंजुकुमारी गुप्ता या धान्य घेण्यासाठी आल्या त्यावेळी त्यांनी गहू निकृष्ठ दर्जाचे असल्याची तक्रार केली. त्यावर शिधावाटप दुकानदार जयस्वाल याने सरकारकडून येणारे गहू आम्ही देतो असं सांगून गुप्ता यांची समजूत काढली होती. याच गुप्ता कुटुंबियांची शिधापत्रिका पूर्वी गहाळ झाली होती. त्याला दुकानदार जयस्वाल हेच कारणीभूत असल्याचा गुप्ता कुटुंबियांचा समज झाला होता. या रागातून काल ११ च्या सुमारास मंजुकुमारीचे पती रामजित गुप्ता आणि मुलगा शिवम गुप्ता या दोघांनी शिधावाटप दुकानासमोर जयस्वाल यांना मारहाण केली. शिवम याने लोखंडी डबा डोक्यात मारल्यानं जयस्वाल रक्तबंबाळ झाले. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading