घोडबंदर जेट्टी वरून पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स व फेरी बोट सुरू करा – खासदार राजन विचारे यांची मागणी

घोडबंदर येथे तयार झालेल्या जेटीवरून प्रवासी बोट व पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स, फेरीबोट सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे खासदार राजन विचारे यांनी केलेली आहे.

आज या जेट्टीची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली असून याचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण होत असल्याने लवकरात लवकर या सुविधा सुरू करा अशी मागणी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना खासदार राजन विचारे यांनी ज्या काही सेवा सुरु कराल त्यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्या जेणेकरून त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल अशा सूचना त्यावेळी देण्यात आल्या.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading