डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या राख्यांचे प्रदर्शन

ठाणे शहरातील एक नामवंत आणि उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ही शाळा. शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या तासाला तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या अंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळ जवळ 2500 राख्या तयार करून प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या राख्यांची विक्रीही विद्यार्थीच करत असतात. या उपक्रमातून जमवण्यात येणारा निधी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी वापरला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शाळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमासाठी शाळेतील हस्तकला शिक्षिका कल्पना बोरवणकर या सर्व प्रकारचे नियोजन करत असतात .या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading