घोडबंदरहून ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर वाघबीळ नाका येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू

घोडबंदरहून ठाण्याकडे येणा-या रस्त्यावर वाघबीळ नाका येथे झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. सेंचेज पिकॉक या धोबीआळी येथे राहणा-या तरूणाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पिकॉक हा आयटी कंपनीत नोकरी करत असून रात्रपाळीवरून दुचाकीवरून परत येत असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्याला तातडीनं जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी टेम्पोचालक रामपाल याला अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading