देवकी राजपूत यांचा महिला दिनी गौरव

ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत असणा-या देवकी राजपूत यांना महिला दिनी गौरवण्यात आलं. कुस्ती या खेळामध्ये केलेल्या विशेष कामगिरीसाठी अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. देवकी राजपूत या कुस्तीच्या राष्ट्रीय खेळाडू तसेच एन आय एस कोच असून ठाण्यातील जुडोचे वरिष्ठ कोच आणि ब्लॅक बेल्ट धारक देवीसिंग राजपूत यांच्या कन्या आहेत.
अखिल भारतीय पोलीस कुस्ती स्पर्धांमध्ये कांस्यपदक मिळवलं आहे. सातत्याने सहा वर्ष राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा मध्ये जुडो आणि कुस्ती या प्रकारात सुवर्णपदक पटकावलं असून देवकी ही डिग्री प्राप्त केलेली महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading