घटस्थापनेसाठी कोणताही विशेष मुहुर्त नाही – दा. कृ. सोमण

नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना २९ सप्टेंबरला होत असून या दिवशी घट स्थापनेसाठी विशिष्ट मुहुर्त नाही. प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत कधीही घटस्थापना करता येईल. त्यातही सकाळी ८ ते दुपारी साडेबारापर्यंत शुभ चौघडी आहे असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. नवरात्रातील पूजा ही आदिशक्ती म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असते. या सुमारास शेतातील धान्य घरात येत असते. निर्मिती आणि ९ या संख्येचं अतूट नातं आहे. बी जमिनीत पेरले की ९ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून ९ महिने ९ दिवसांनी मूल जन्माला येते. ९ ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. ९ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. म्हणून ९ दिवसात पूजा करून दररोज एक याप्रमाणे माळा बांधतात. घटामध्ये मातीत धान्य पेरतात. तर अखंड दीप लावून ठेवला जातो. यावर्षी ९ दिवसात एकाही तिथीची क्षयवृध्दी न झाल्यामुळे नवरात्र सलग ९ दिवस आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading