खाडी किनारा मार्ग हा गायमुख ते फाऊंटन उन्नत मार्गाला जोडण्यात आला तर शहरावरून येणारी वाहनं वेगानं जातील आणि शहरातील वाहतूक कोंडीवर ताण येणार नाही. यासाठी गायमुख कोस्टल रोड ते गायमुख फाऊंटन उन्नत मार्ग जोडला जावा अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. वन विभागाकडे रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एका बैठकीचं आयोजन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. या बैठकीत विचारे यांनी ही मागणी केली. वन विभागाकडे प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार विचारे पाठपुरावा करत असून यामुळे काही प्रकल्प मार्गी लागले आहेत.