गणेश कोकाटे याची हत्या करणा-या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केली अटक

ठाण्याच्या कशेळी गावाच्या कमानीजवळ गणेश कोकाटे याची अग्निशस्त्रातून गोळीबार करून हत्या करणा-या दोन आरोपींना ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे. गणेश कोकाटेची हत्या ७ डिसेंबर रोजी झाली होती. तेव्हापासून आरोपी हे फरारी होते. अखेर गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलीस पथकाला हे संशयित आरोपी इंदिरानगर नाका येथे सकाळच्या सुमारास येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून धनराज उर्फ धन्या तोडणकर आणि संदीपकुमार कनोजिया यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading