गडकरी रंगायतन परिसरातील वेश्याव्यवसायावर शिवसैनिकांची धाड

गडकरी रंगायतन परिसरातील वेश्या व्यवसायावर शिवसैनिकांनी शनिवारी संध्याकाळी अचानक धाड टाकल्यानं खळबळ उडाली. गडकरी रंगायतन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलीसांसह वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. मात्र यावर तोंडदेखली कारवाई होत होती. मात्र शिवसैनिकांनी अचानक हल्लाबोल करून ५ महिलांना रंगेहात पकडून पोलीसांच्या ताब्यात दिलं. शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्यासह काही शिवसैनिकांनी गडकरी रंगायतन परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक धाड टाकून शरीरविक्रय करणा-या महिलांना घेराव घालून पकडलं. त्यामुळं पोलीसांची एकच पळापळ झाली. नागरिकही या प्रकारामुळे संतप्त झाले होते. अखेर वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांची समजूत काढत अहोरात्र पोलीस बंदोबस्त तैनात केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading