गडकरी रंगायतनमध्ये शुक्रवारी साजरा होणार महापालिकेचा वर्धापनदिन

ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा मात्र वर्धापनदिनाचे औचित्य साधत शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणेश आरास स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा गडकरी रंगायतन येथे आयोजित केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. महापालिकेच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत.नगरपालिका ते महानगरपालिका असा विकासाचा आलेख उंचावणाऱ्या महापालिकेच्या विकासाच्या यशात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, महापालिका कर्मचा-यांचा निश्चितच मोलाचा सहभाग आहे. या कार्यक्रमात ठाणे महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग समिती कार्यालय, दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहातील महापालिका कर्मचारी सहभागी होणार आहेत. या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धा २०२२मधील विजेत्या गणेशमंडळांचा पारितोषिक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading