गटारात पडलेल्या मानसिक रूग्णानं महापालिकेला लावलं कामाला

लॉकिम समोरील गटारात एक मानसिक संतुलन ढळलेली व्यक्ती पडल्यामुळे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला त्रास झाला. दुपारी १२च्या सुमारास लॉकीम कंपनी समोरील गटारात एक व्यक्ती पडल्याचे समजून काही शाळकरी मुलांनी पोलीसांना फोन केला. चरसी मंडळी आपल्या व्यसनासाठी महापालिकेच्या गटारांची झाकणं अथवा तत्सम वस्तू पळवून आपलं व्यसन भागवत असतात. तसाच एक चरसी गटारामध्ये लोखंड काढण्यासाठी उतरला होता. गटारात उतरून तो गटारातील लोखंड बाहेर टाकत होता. त्याचवेळी समोरील शाळेच्या मुलांना गटारातून काहीतरी बाहेर पडतंय हे दिसलं त्यांनी हे पाहून गटारात वाकून पाहिलं असता त्यांना हा चरसी दिसला. या व्यक्तीनं त्यांना पाहिलं असता तो गांगरून गेला. या शाळकरी मुलांनी ही बाब १०१ क्रमांकावर फोन करून पोलीसांना कळवली. पोलीसांनी ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर माणसं पाहून मानसिक संतुलन ढळलेली ही व्यक्ती आणखी खवळली आणि गटारामध्ये जवळपास २० ते २५ फूट आत जाऊन बसली. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी त्याला पकडून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला असता त्याने कर्मचा-यांवरही हल्ला केला. अखेर या गटारावरील स्लॅब पोकलेननं तोडून या मानसिक संतुलन ढळलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading