खासदार श्रीकांत शिंदेंच्या वतीने कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जिल्यात गेल्या चार दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. कल्याण तालुक्याला चार दिवसापासून धुवांधार कोसळणा-या पावसामुळे कल्याण तालुक्यातील पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्याचे पावसाळ्याचे पाण्याने म्हारळ, वरप, कांबा येर्थिल गावांतील घरामधले अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी २६ जुलै रोजी तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा येथील पूरग्रस्त नागरिकांना चटई, चादर, तांदूळ, डाळ, तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून २ हजार कुटुंबांना मदत देणार आहे. कल्याण तालुक्यातील पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहत असल्यानं अनेक गावातील गटारे, नालेसफाई न झाल्याने भरभरुन वाहत होते. गावातील गल्ली, बोळाला नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यामुळे गावांतील नागरिकांच्या घरी पाणी शिरून मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचे नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळते. म्हारळ, वरप आणि कांबा या तीनही गावांना पुराचा खुप मोठा फटका बसला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ग्रामस्थांचे नुकसान पाहता श्रीकांत शिंदे यांनी पूरग्रस्तांना चटई, ब्लॅंकेट, सतरंजी, टॉवेल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू तसेच धान्यांचे पॅकेटही वाटले. त्याचबरोबर पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईकरिता पंचनामे झाले असून त्यांना शासनाच्या प्रचलित अटीनुसार आणि पात्रतेनुसार त्यांना शासनाकडून आर्थिक मदत तसेच नुकसान भरपाई मोबदला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading