खासदार राजन विचारे यांची बदनामी करणारा व्हिडीओ प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा

खासदार राजन विचारे यांची बदनामी करणारा व्हिडीओ प्रकाशित केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने नौपाडा पोलीस स्थानकात धाव घेण्यात आली. शांतता भंग करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम शिंदे गटाकडून केले जात आहे. खासदार राजन विचारे यांच्या व्हिडिओ मध्ये छेडछाड केल्याप्रकरणी तसेच नौपाडा स्थानकाच्या आवारात आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात घोषणा देणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता ४९९, ५०० आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या युवा सैनिकांनी केली आहे. युवा सैनिकांनी तसे निवेदन नौपाडा पोलिसांना दिले आहे. खासदार राजन विचारे यांनी आपल्या वक्तव्यात कोणत्याही ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र काही जण उगाचच पराचा कावळा करून संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. खोटे व्हिडीओ पसरवून विचारेना बदनाम केले जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान, आनंद आश्रमाचा नाव बदलले तेव्हा कुठे गेले, आश्रमात बूट घालून जातात तेव्हा कुठे याचे प्रेम गेले. असा सवाल करीत येणाऱ्या निवडणुकीत ठाणेकर जनता शिंदे गटाला चांगलाच धडा शिकवेल असा विश्वास युवासैनिकांनी व्यक्त केला. वायरल होणाऱ्या या व्हिडिओची पोलिसांनी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवासैनिकांनी केली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading