संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात दोन गोविंदा पथकांनी नऊ थर लावण्याचा केला विक्रम

संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात दोन गोविंदा पथकांनी नऊ थर लावण्याचा विक्रम नोंदवला आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान तर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवातच सर्वप्रथम 9 थर लावण्यात आले होते. आजही कोकण नगर जोगेश्वरी गोविंदा पथकानं 9 थर रचण्याचा विक्रम केला आहे. त्या पाठोपाठ जय जवान गोविंदा पथकानाही 9 थर रचून आपला विक्रम पुन्हा नोंदवला आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवातच जय जवान गोविंदा पथकानं सर्वप्रथम 9 थर रचण्याचा विक्रम केला होता.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading