खारेगाव टोल नाक्याजवळ एका चारचाकी गाडीला आग

खारेगाव टोल नाक्याजवळ मुंब्र्याकडे जाणा-या रस्त्यावर एका चारचाकी गाडीला आग लागली होती. सुदैवाने यामध्ये कोणताही जिवितहानी झाली नाही. आज संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. मुब्र्याकडे जाणा-या रस्त्यावर एका टाटा झेस्ट गाडीला अचानक आग लागली. या गाडीत तीन व्यक्ती प्रवास करत होत्या. परंतु कोणालाही दुखापत झाली नाही. आग लागल्याची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेऊन ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading