खारेगांव येथील सहकार प्रसारक मंडळाच्या सह्याद्री शाळेतील लिफ्टमध्ये चार जण अडकले

खारेगांव येथील सहकार प्रसारक मंडळाच्या सह्याद्री शाळेतील लिफ्टमध्ये आज चार जण अडकून पडले होते. या शाळेची लिफ्ट पहिल्या मजल्यावर अचानक बंद पडल्यानं या लिफ्टमध्ये असलेले अजित घरत, धनंजय वनारी, राजेश येवडे आणि सुनिल बरांगुळ असे चौघे लिफ्टमध्येच अडकले. याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन लिफ्टमध्ये अडकलेल्या या चौघांची सुटका केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading