कळव्यात मतदानाबाबत जनजागृती करणारी विद्यार्थ्यांची रॅली

मतदानाने लोकशाहीचा कणा बळकट करा, सारे काम छोड दो सबसे पहले व्होट दो अशा घोषणा देत मतदानाबाबत जनजागृती करणारी विद्यार्थ्यांची एक रॅली कळव्यातून काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अग्रसेन हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या रॅलीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे नोडल अधिकारी विजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोबानगर ते मुकंद कंपनी परिसरातून ही रॅली काढण्यात आली. २९ एप्रिलला मतदान होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मतदानाचा टक्का वाढवावा असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी हातात फलक घेऊन मतदान करण्याचं आवाहन करण्यात आले. बाते अभी अधुरी है-वोट देना जरूरी है, जागो जागो मतदारदाता-तुम हो भारत के विधाता, मतदान करना हर नागरिक का कर्तव्य है असे संदेश यावेळी देण्यात आले. तसंच मतदान प्रक्रियेत यंदा समाविष्ट असलेल्या व्हीव्हीपॅट मशिनचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. कळवा पूर्वतील विविध शाळांमध्ये चुनावी पाठशाला या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. या चुनावी पाठशालाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदानास प्रवृत्त करणे, त्याचबरोबर नातेवाईक आणि शेजारी यांनाही मतदानाचं महत्व पटवून देत मतदान करण्यास प्रोत्साहीत करणे हा या मागचा उद्देश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading