इनरव्हील क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्डच्या पुढाकारानं सौंदर्य स्पर्धेचं आयोजन

इनरव्हील क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड डिस्ट्रीक्टच्या पुढाकारानं ओरा ब्युटी पेजंट या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन येत्या रविवारी करण्यात आलं आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. ओरा ब्युटी पेजंट ही स्पर्धा मिस इनरव्हील, मिस क्लासिक या दोन गटात, उत्कृष्ट केस, स्मित, वेशभुषा, मैत्री, उत्कृष्ट चाल आणि अदा या निकषावर होणार आहे. डिस्ट्रीक्ट ३१४ विभागात ६४ क्लब आणि ३ हजाराहून अधिक महिला सभासद आहेत. प्रत्येक क्लबमधून आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढवण्याच्या दृष्टीनं इंटरनॅशनल सर्व्हीस ऑर्गनायझर कार्यरत असतात. यावर्षी डॉ. शोभा डॅनियल यांनी ब्युटी पेजंटला प्राधान्य दिलं आहे. माजी अध्यक्षा नंदिनी साळवी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणा-या या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading