खड्ड्यात कागदी नौका सोडत ठाण्यात भाजपाचे आंदोलन

ठाणे शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना शिवसेना आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने शहरातील विविध ठिकाणी आंदोलन केले. खड्यात कागदी नौका सोडण्याबरोबरच मासेमारीसाठी गळ टाकण्याबरोबरच विविध ठिकाणी खड्डे भरण्यात आले. या वेळी सत्ताधारी शिवसेनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
मॉडेला चेकनाका येथे झालेल्या मुख्य आंदोलनात आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मॉडेला चेकनाक्याबरोबरच गटनेते संजय वाघुले यांनी ओवळा नाका, नगरसेविका स्नेहा आंब्रे यांनी मानपाडा, नगरसेवक मिलिंद पाटणकर, वैभव साटम यांनी कॅसल मिल, लोकमान्य नगर, दिवा येथे आंदोलन करण्यात आले. तसेच या भागातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. गौरी-गणपतीपूर्वी खड्डे भरणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, आता गणपतीचे खड्ड्यातूनच आगमन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमध्ये रस्ते दुरुस्ती करण्याची वेळ असताना, केवळ टक्केवारीसाठी पावसाळ्यात खड्ड्यांचे जाळे पसरण्याची वाट सत्ताधारी शिवसेनेने पाहिली असा आरोप निरंजन डावखरे यांनी दिला. सध्या अयोग्य पद्धतीने खड्डे बुजविले जात असून, वाहने घसरत आहेत. योग्य पद्धतीने खड्डे न बुजविल्यास भाजपातर्फे तीव्र आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा आमदार डावखरे यांनी दिला.
गोल्डन गॅंग आणि ठेकेदाराच्या अभद्र युतीमुळे गेल्या २५ वर्षांपासून ठाणेकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. केवळ सत्ताधारी आणि कंत्राटदारांच्या संबंधांमुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत, असा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading