ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं मुलुंडमधील पद्मश्री नर्सिंग होममधील एका डॉक्टरला रेमडेसिवीर इंजेक्शन चारपट दर वाढवून विकत असल्याबाब त्याच्या सहाय्यकासह अटक केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे हे रेमडेसिवीर इंजेक्शन सामान्य विक्रीसाठी नसून ते फक्त शासकीय विभागासाठीच वापरण्याचे होते. यामध्ये ठाणे महापालिकेचे काही अधिकारीही सामील असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खंडणीविरोधी पथकानं तीन हात नाका येथे सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडलं.