पालकमंत्र्यांचं सहकुटुंब लसीकरण – सर्वांनी लसीकरण करून घेण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन

ठाण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी लस घेणं आवश्यक असून आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लसीकरण करून घेतलं. जिल्हा रूग्णालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडील, पत्नी, सून अशा कुटुंबियांबरोबर कोरोनाची लस घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक असून सर्वांनी लस टोचून घ्यावी असं त्यांनी सांगितलं. कोरोनाला आवर घालण्यासाठी गर्दी टाळणं, मास्क घालणं आणि शासनाने जारी केलेले निकष पाळणं आवश्यक असून सर्वांनी त्याची अंमलबजावणी करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. पालकमंत्री यांचं लसीकरण होत असताना जिल्हा शासकीय रूग्णालयाचे शल्य चिकित्सकही उपस्थित होते. रेमडेसिवीर विषयी बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपण स्वत: आरोग्यमंत्र्यांशी बोललो असून यावर लवकरच मार्ग निघेल. खरंतर रेमडेसिवीर हे औषध आवश्यक असेल तरच देण्याची गरज आहे. उगीच सर्वांना देण्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading