क्लस्टर सुनावणीला उपस्थित राहून बाळकुम ग्रामस्थांचा क्लस्टरला लेखी विरोध

बाळकुम ग्रामस्थांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता क्लस्टर सेलनं बोलवलेल्या क्लस्टरच्या सुनावणीला संघटितरित्या हजर राहून क्लस्टर योजनेला असलेला लेखी विरोध नोंदवला. क्लस्टरवरील आपल्या हरकती नोंदवण्यासाठी बाळकूम ग्रामस्थांना सुनावणीला बोलवण्यात आलं होतं. मात्र या सुनावणीला हजर राहण्याची आवश्यकता नाही. सुनावणी रद्द झाली असल्याचं स्थायी समिती सभापतींनी जाहीर केलं होतं. मात्र पालिकेकडून असं काहीही लेखी कळवण्यात न आल्यामुळं बाळकूम ग्रामस्थांनी सुनावणीला हजर राहून आपला विरोध नोंदवला. २८८ हरकत घेणा-यांनी यावेळी आपल्या हरकती नोंदवल्या मात्र या प्रकरणात दिशाभूल करणा-यांच्या विरोधात कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षात ग्रामस्थ सुनावणी रद्द करा यासाठी बराच पत्रव्यवहार करतात मात्र त्यावर काहीच होत नाही. पण स्थायी समिती सभापती, नगररचना अधिका-यांना सुनावणी रद्द करण्यासाठी पत्र लिहितात आणि त्यावर त्याच दिवशी कार्यवाही होते अशीच तत्परता जनतेच्या प्रश्नावरही दाखवावी अशी अपेक्षा या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. क्लस्टर प्रकरणात जोपर्यंत राज्य शासन अध्यादेश काढत नाही तोपर्यंत भुमिपुत्रांचा लढा चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading