जय अंबे माँ विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दिलीप देहेरकर यांचं दीर्घ आजारानं निधन

जय अंबे माँ विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दिलीप देहेरकर यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ठाण्यातील टेंभीनाक्यावर जय अंबे माँ विश्वस्त संस्थेतर्फे नवरात्रौत्सव साजरा केला जातो. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या बरोबरीने दिलीप देहेरकर या नवरात्रौत्सवात सहभागी असत. काँग्रेसचे नेते असतानाही शिवसेनेच्या उत्सवात त्यांचा असणारा सहभाग हा अनेकदा औत्सुक्याचा विषय होता. गेले काही महिने देहेरकर हे आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading