क्रीडा प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस

कापूरबावडी भागात एका ४० वर्षीय क्रीडा प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ठाण्यात पिडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते. तिला टेनिस शिकविण्यासाठी पालकांनी नवी मुंबईत राहणाऱ्या एका ४० वर्षीय प्रशिक्षकाची नेमणूक केली होती. काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागले होते. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला दवाखान्यात नेले. तिथे तिची प्राथमिक तपासणी करून तिला औषधे देण्यात आली. दोन दिवस उलटूनही पोटदुखी कमी होत नसल्याने तिला एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी ती सात आठवडे गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्रशिक्षकाला अटक केली आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading