कै.मुग्धा चिटणीस घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धा

आनंद विश्व गुरुकुल आणि महाविद्यालयात कै.मुग्धा चिटणीस घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळजवळ ३५ विद्यालयांनी आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या सुरुवातीला बेडेकर शाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक चिटणीस यांनी विद्यार्थ्यांना कथाकथना विषयी मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या साहित्यिकांच्या आणि स्वयंरचित कथा सांगितल्या.बदलत्या काळानुसार कथाकथन स्पर्धा मागे पडत चाललेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेकडे वळावे यासाठी या आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचषक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या विद्यालयाला सुद्धा स्मृतीचषक देण्यात आले. वसंत विहार हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी जास्वंदी दणाईत तसेच जोशी बेडेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी काजल घाटोळे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading