दिवा ते डोंबिवली बस सेवा अखेर सुरू

अनेक वर्षांपासून मागणी केलेली दिवा ते डोंबिवली ही ठाणे महापालिका परिवहनची (टीएमटी) बस सेवा अखेर गुरुवार पासून सुरू झाली. शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून टीएमटीच्या या नवीन मार्गाचा श्रीगणेशा करण्यात आला. दिवा शहराला डोंबिवलीला जोडण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा ते डोंबिवली हा ठाणे परिवहनचा नवीन मार्ग क्रमांक (क्रमांक ७६३) १२ ऑक्टोंबर रोजी सुरू झाला. या मार्गावर सुरुवातीला दिवा- डोंबिवली आठ फेऱ्या असणार आहेत. याचा फायदा दिवा शहरातील दिवा चौक ते डोंबिवली प्रवासात अनेक गावे आणि शाळा येत आहेत त्यांना होणार आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading