क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी मारावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.