राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला आज सकाळी आग

राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसला आज सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. मात्र बस चालक आनंद सवारे यांनी बसला आग लागल्याचं लक्षात येताच बस रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. त्यामुळं कोणतीही जिवितहानी झाली नाही. या बसमधून ६५ प्रवासी प्रवास करत होते. राज्य परिवहन महामंडळाची ही बस ठाण्याहून भिवंडीकडे जात होती. या बसमध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या बसला आग लागल्याचं लक्षात आल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तात्काळ विझवली. या आगीमुळे कोणत्याही प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading