कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात 14 हजार 683 मतदारांची नोंदणी

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2022-2023 चा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यामधील 12 मतदार केंद्रे असून आतापर्यंत 30 डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात 14 हजार 683 मतदारांनी नोंदणी केली आहे. नामनिर्देशनपत्रे भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 12 जानेवारीपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. अंबरनाथ – एकूण मतदार 1904, भिवंडी – 1789, भिवंडी (वज्रेश्वरी) – 83, कल्याण – 3037, कल्याण (डोंबिवली) – 1059, मुरबाड – 525, शहापूर – 860, शहापूर – 234, ठाणे 2169, भाईंदर – 726, वाशी 1620, उल्हासनगर – 677 अशा एकूण 14 हजार 683 मतदारांची नोंदणी झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading