कौटुंबिक कलहातुन सून सासूला मारहाण करतानाचा धक्कादायक व्हीडिओ व्हायरल

कौटुंबिक कलहातुन मारहाण केल्याचा धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या चित्रणात एक महिला आपल्या वृद्ध सासूला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा प्रकार ठाणे पूर्वेकडील कोपरीतील सिद्धार्थनगरमधील असुन ही महिला युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये काम करते. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोमल दयारामाणी असे महिलेचे नाव असून ती सिद्धार्थनगर कोपरी येथे सासूसोबत राहते.गेल्या अनेक महिन्यांपासून सून आणि सासू यांच्यात भांडण सुरू आहे. याशिवाय, कौटुंबिक वादामुळे सून दररोज सासूला जबरदस्तीने मारण्याचा किंवा तिला जमिनीवर ओढण्याचा प्रयत्न करते, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोपरी पोलिस ठाण्यात सुनेविरुद्ध कलम ३३६, ३३७, ३२३,५०४, ५०६ अन्वये दाखल करण्यात आला आहे. सुनेचे सासूशी भांडण
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती महिला तिच्या सासू-सासऱ्यांसोबत काही मुद्द्यावरून वाद घालत असताना तिला घर सोडण्यास सांगत आहे. महिला सासूला मारहाण करते. यावेळी सासूही घरातून निघून जा, असे सांगते. दरम्यान, महिलेने घराचे गेट उघडले आणि सासूला बाहेर जाण्यास सांगितले. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिला सोफ्यावर बसलेल्या तिच्या वृद्ध सासूला ओढत आहे. ही महिला तिच्या सासूला अनेकदा मारहाण करताना दिसत आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading