कोव्हीड 19च्या चाचणीसाठी विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक

कोव्हीड 19च्या चाचणीसाठी विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक असल्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. कोव्हीड 19 या साथ रोगाचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या चाचणीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत विलगीकरण कक्षात राहण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. संबंधित व्यक्ती कोरोना बाधीत निघाल्यास त्या व्यक्तीपासून नॅान कोव्हीड व्यक्तीस संसर्ग होवू नये म्हणून पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हा निर्णय घेतला आहे. खासगी चाचणी केंद्रांच्या माध्यमातून कोरोनाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी अपेक्षित असतो. जर त्या व्यक्तीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला तर या कालावधीत त्याच्या पासून अनेक लोकांना कोव्हीडचा संसर्ग होवू शकतो. ही बाब लक्षात घेवून अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक राहणार आहे आणि तशा प्रकारचे हमीपत्र त्याने चाचणीच्यावेळी देणे बंधनकारक राहणार आहे. कोव्हीडची बाधा इतरांना होवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading