बालकलाकार अथर्व वगळ ची कोरोना व्हायरसबाबत जनजागृती

ठाण्यातील सिंघनिया स्कुल मधील ६ वी तील बालकलाकार अथर्व वगळने  कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी एक गाणं तयार केलं आहे. शाळेतील मुलांना बरोबर घेऊन घरीच हम होंगे कामयाब हे जनजागृती गाणं अभिजित रसाळ यांच्या सहकार्याने तयार केलं आहे. भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून या गाण्याच्या माध्यमातून भारतीय नागरिकांविषयी जागृती करण्यासाठी त्याने या छोट्या वयात पाऊल उचलले आहे. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच ट्विटर वरसुध्दा त्याने या गाण्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या आधीही शॉर्ट फिल्म च्या माध्यमातून अथर्व वगळने कोरोना व्हायरस बाबत सामाजिक जनजागृती केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading